Daily Mahasatta

Daily Mahasatta

नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीने पतसंस्थेतील ठेवी मोडाव्यात : माजी सरपंच सुहास कदम

वाळवा (रहिम पठाण)
मसुचीवाडी ता. वाळवा येथील पाठीमागील पाच वर्षीच्या कालखंडात ग्रामपंचायतीकडे जी रक्कम ठेवीच्या रुपात शिल्लक आहे, त्याच रक्कमेतून गावामध्ये शुध्द पाण्याचे एटीएम मशीन बसवावे, अशी मागणी माजी सरपंच सुहास कदम यानी केली आहे.

काही दिवसात पाऊस सुरु होतोय आणि या कालखंडात पुर परिस्थिती व पाऊसामुळे माती मिश्रित पाणी नागरिकांना प्यावे लागते. यामुळे लोकांच्या आरोग्यावरती दुष्परीणाम होतात. या पासून वाचण्यासाठी ही उपाय योजना करावी, असे मत त्यांनी व्यक्त केली.

पाठीमागील पाच वर्षाच्या कालखंडात ग्रामपंचायतने गावातील एका पतसंस्थेचे काही लाख रुपये ठेव रुपात रक्कम शिल्लक ठेवलेले आहे असे सांगितले याच पैशातून ही सुविधा गावातील नागरीकांच्यासाठी उपलब्ध करता येईल अशी आग्रहाची मागणी त्यांनी मसुचीवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

1 Comments

  1. बातमी देताना कोणत्या पतसंस्था त्याचे नाव द्याचे किती रुपये आहेत हे द्यावी तुम्ही कसले न्युज वाले अर्धवट बातमी देताय नाहीतर न्युज द्याची नाही

    ReplyDelete