Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुुक्यात महिला राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

इस्लामपूर ( हैबत पाटील) : एका बाजूला कोरोनाचे महासंकट आणि दुसऱ्या बाजूला गॅस,पेट्रोल, डिझेलची प्रचंड दरवाढ,आणि वाढत्या महागाईने बेजार झालेल्या महिलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आप-आपल्या दारात महागाई विरोधी आंदोलन केले. दारात मोकळ्या गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून;जनता महागाईने त्रस्त,तर पंतप्रधान महाल बांधण्यात व्यस्त; मोदी है,तो महंगाई है अशा पाट्या हातात घेत,तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले. वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने वाळवा तालुक्यातील आंदोलनाचे संयोजन केले.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव सौ. छाया पाटील यांनी कामेरी,वाळवा तालुकाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव यांनी नरसिंहपूर, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ. मेघा पाटील यांनी शिगांव, तर तालुका उपाध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांनी बहे या गावात आपल्या पाच सहकारी महिलांना सोबत घेवून आंदोलन केले. 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. सुस्मिता जाधव म्हणाल्या,महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे महागाई विरोधी आंदोलन केले आहे. कोरो नाच्या संकटाविरोधात आम्हा महिलां ना संघर्ष करावा लागत आहेच. त्यापेक्षा जादा संघर्ष नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासन पुरस्कृत महागाईविरोधी करावा लागत आहे. केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत उज्ज्वला गॅस योजना आणली,मात्र त्यांनी दिलेले गॅस सिलेंडर,आणि शेगड्या धूळ खात पडल्या आहेत. आमच्या भगिनी पुन्हा चुलीवर जेवण करीत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे, याचे केंद्रास गांभीर्य आहे का? केंद्र शासनाने तातडीने गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढ कमी करून महागाई कमी करावी,अशी आमची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments