Daily Mahasatta

Daily Mahasatta

सहयाद्री व्याघ्रप्रकल्पात दुर्मिळ ग्रीफॉन जातीच्या गिधाडाची नोंद

इस्लामपूर (हैबत पाटील) : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदाच अत्यंत दुर्मिळ ग्रीफॉन  जातीच्या गिधाडाची नोंद झालेली आहे.सह्याद्री प्रकल्पात घिरट्या घालत असताना ते गिधड कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

जंगली जयगड परिसरात वनक्षेत्रपाल स्नेहल मगर,वनरक्षक संतोष चाळके, हे कराड फिरती पथक यांच्या साह्याने जंगली जयगड परिसरात नेहमी प्रमाणे गस्त घालत असताना हे गिधड घिरट्या घालत होते. त्याने ते कॅमेरा बध्द केले.सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा वन्यजीवांच्या साठी संजीवनी ठरत आहे. हा पक्षी कजाकीस्थान, किरकीस्थान, तिबेट, मंगोलिया, दक्षिण चीन, मंगोलिया,युरोप, उत्तर अमेरिका, या ठिकाणी आढळतो.हा पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करत असतो.त्याच्या दोन्ही पंखांची लांबी नऊ फूट असते तर त्याची उंची १२५ सेंटीमीटर असते.त्याचे वजन दहा किलो पर्यंत असते.त्याच्या पाठीवरचे पंख रुंद व तांबूस असतात. व डोकयवर पंख पांढरे शुभ्र असतात. हा उंच आकाशात घिरट्या घालून आपले भक्ष्य शोधत असतो .तर तो आपले घरटे अति उंच ठिकाणी बांधत असतो या गिधाडांच्या उजव्या पंखाला लाल रंगाचा विशिष्ट टॅग लावलेला आहे.वन अधिकाऱ्यांच्या मते काही पक्षी अभ्यासक त्याचा स्थलांतराचा मार्ग शोधण्यासाठी तो टॅग लावतात.गिधाडावर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना या घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. मानवाने जंगलावर केलेले अतिक्रमण या मुळे दुर्मिळ वन्य जीव संपत चालले आहेत. मात्र सह्याद्रीच्या हिरवाईत  नव नवीन पाहुणे येतात ही एक बाब चांगली असल्याचे वन्य प्रेमी तुन समाधान होत आहे.

Post a Comment

0 Comments