Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ३८ जणांचा कोरोनाने बळी

: कोरोना रुग्ण संख्या स्थिर
: मात्र मृतांचा आकडा कायम 

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाने ३८ जणांचा तर म्युकरमायकोसीसने दोघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आज १२७४ इतक्या नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाशल्य चिकित्सक यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या सात दिवसात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनामुळे बळी जाणारांची संख्या अजूनही कायम आहे. दररोज जिल्ह्यात पस्तीस ते चाळीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. मृतांचा आकडा निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात सद्या १२ हजार ८७६ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात १६१२ इतक्या उच्चांकी संख्येने रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आज सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ५१, जत १११, कडेगाव १२१, कवठेमंहकाळ २६, खानापूर १०८, मिरज १९४, पलूस ६९, शिराळा ११९, तासगाव ११९, वाळवा १९७ तसेच सांगली शहर १२१ आणि मिरज शहर ३८ असे सांगली जिल्ह्यातील एकूण १२७४ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments