Daily Mahasatta

Daily Mahasatta

गर्भावस्थेत कोरोनाला घाबरू नका : स्त्रीरोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी

ग्रामीण भागातल्या गर्भवती महिलांसाठी मोफत तपासणी

जत (सोमनिंग कोळी) : ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्यामध्ये कोरोनाची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. गर्भावस्थेत कोरोना झाल्यास महिलांनी कोणती ? काळजी घेतली पाहिजे, याबाबत अनेक स्तरावर प्रबोधन होत आहे, सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी यांनी याबाबत आता पुढाकार घेत जत मध्ये ग्रामीण भागातल्या गर्भवती महिलांसाठी मोफत तपासणी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने "दै. महासत्ता शी" बोलताना डॉक्टर रवींद्र आरळी यांनी गरोदर अवस्थेतील महिलांना कोरोना झाल्यास नेमकी काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले आहे.

◆ ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या मध्ये अधिक भीती.
करोनाग्रस्तांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली आहे. त्यात घरात एखादी महिला गरोदर असेल तर ती चिंतेची बाब बनली आहे. ज्या महिलांना गर्भावस्थेत करुणा झाला त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागलेला आहे. विशेषता सात ते आठ म्हणण्यात प्रसूती त्याचबरोबर अनेक गोष्टी गरोदर महिलांच्याबाबतीत घडत असल्याची बाब समोर येत आहेत. त्यामुळे गरोदर महिलांच्या मध्ये विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाच्या बाबतीत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र या परिस्थितीमध्ये गरोदर महिलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही,विशेष काळजी घेतल्यास मातेला आणि तिच्या बाळाला काही होत नाही, असं मत सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले आहे. आणि गर्भावस्थेतील महिलांच्या मधील ही भीती आणि त्यांच्यावर तातडीने उपचार तपासणी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर आरळी यांनी आता पुढाकार घेतला आहे, जत मध्ये त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांच्यासाठी ग्रामीण भागातल्या गरोदर महिलांच्यासाठी मोफत तपासणी सुरू केली आहे.

महिलांनी घाबरून जाऊ नये..
या सेवेबाबत "दै. महासत्ता"शी बोलताना डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले, यात गरोदर अवस्थेतील महिलांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी आपण सर्वतोपरी सेवा चालू केली आहे. जर तुम्ही गरोदर असाल, तुम्हाला ताप आला किंवा नव्याने, सततचा खोकला सुरु झाल, तर तुम्ही पाच दिवस घरातच रहायला हवं आणि जर पाच दिवसांतही तुमची स्थिती सुधारली नाही,तुमचा आजार वाढतच गेला किंवा घरात राहून या स्थितीवर मात करता येणार नाही,असं तुम्हाला वाटत असेल तर घाबरून न जाता पुढील उपचारांसाठी तुम्ही रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.

 गरोदर अवस्थेतील कोरोनाचे लक्षणे ..
गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः पोट दुखणे, रक्तस्राव,अचानक गर्भाचा मृत्यू , कमी दिवसांमध्ये बाळंतपण, ऑक्सिजनची गरज वाढणे ही लक्षणे गरोदर महिलांच्या दिसत आहेत. त्यामुळेच गरोदर महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणं,आणि स्त्रीरोगतज्ज्ञकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. तसेच गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या बदलांमुळे त्यांना कशाचाही संसर्ग किंवा तापासारखा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

Post a Comment

0 Comments