Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शिराळ्यातील विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील संतोष आनंदा खाडे वय ३० या विवाहित तरुणाची खाडे वस्ती वरील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

संतोष खाडे हा पत्नी, वडील व भाऊ यांच्या समवेत शिराळे खुर्द गावच्या पूर्वेस असलेल्या खाडे वस्ती नावाच्या शेतातील घरात राहतो. सकाळी दहाच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचे वडील गावात तर पत्नी शेतात व भाऊ कामधंद्यासाठी बाहेर गेला होता. वडील आनंदा खाडे हे गावातून परत आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत शिराळा पोलिसात पोलीस पाटील अनिता पाटील यांनी वर्दी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी पाटील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments