Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत टायर जप्ती मोहिम

सांगली (प्रतिनिधी) : कोविडशी सामना करत असताना महापालिका प्रशासनाने आगामी पावसाळापूर्व तयारीलाही सुरूवात केली आहे. या अंतर्गत मनपाक्षेत्रात डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून रस्त्यावरील टायर जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपा आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून ही कारवाई सुरू आहे.

मनपाक्षेत्रात अनेक ठिकाणी रिकाम्या टायरी पडून आहेत. यामुळे यात पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करून रिकामे टायर जप्तीचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य विभागाला दिले होते. यानुसार आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर , स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे,पंकज गोंधळे, नितीन कांबळे यांच्यासह पथकाने सांगली आणि मिरजेतील अनेक ठिकाणी पडून असलेल्या रिकाम्या टायरी जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. तसेच मनपाक्षेत्रात टायर जप्तीची ही मोहीम अशीच राबविली जाणार आहे. तसेच ज्या ज्या भागात असे मोकळे टायर आढळून येतील त्या ठिकाणी टायर जप्त केले जातील असा इशारा आरोग्यधिकारी रवींद्र ताटे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments