Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ मधील चौघांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

इस्लामपूर, (सूर्यकांत शिंदे) : पेठ (ता. वाळवा ) येथील एका पेट्रोल पंपावर कामगारास बदली ड्युटी न दिल्याच्या कारणाकरून प्रकाश धर्मा पवार (वय ५७) यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी संदीप बाळासो पाटील (वय २७), ऋषिकेश बाळासो पाटील व दोन अनोळखी रा. सर्वजण पेठ ता. वाळवा अशा चौघांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश धर्मा पवार पेठ, ता. वाळवा यांनी इस्लामपूर पोलिसांत दिली आहे.

याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मार्च महिन्यात बदली ड्युटी न दिल्याच्या कारणावरून प्रकाश पवार यांनी संदीप पाटील याला विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून संदिपने भांडण करुन त्याला जखमी केले होते. रविवारी रात्री साडेदहा वाजन्याच्या सुमारास संदीप पाटील याने ऋषिकेश व अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन प्रकाश पवार च्या घरी गेला. संदीपने प्रकाशला,' तुझे मुलाला मारायला पाठवले का ? अशी विचारणा करीत, का रे पाटलाला मारायला ... लोक पाठवतो काय ? असे जातीवाचक शब्द वापरून प्रकाश पवार यांचा अपमान केला. यावरून प्रकाश पवार यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments