Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातील डाॅ. सांगरुळकर यांचे हाॅस्पिटल बंद करावे : माजी खा. शेट्टी

इस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपुर येथील लक्ष्मी नारायण हाॅस्पिटल मधील डाॅ. सचिन सांगरुळकर व त्यांच्या पत्नी डाॅ. नैनिता सांगरुळकर यांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे मृत झालेल्या कुटुंबाने वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समिती व माजी खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन न्याय मिळावा व संबधीत लक्ष्मीनारायण हाॅस्पिटल चे डाॅ. श्री व सौ. सांगरुळकर यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी विनंती केली.

यावर जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले तर पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यत हा लढा सुरु ठेवु. वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समिती व माजी खा. राजु शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

दि. २ मे रोजी कै. धोंडीराम वसंतराव पाटील रा. कापुसखेड यांचे लक्ष्मीनारायण हाॅस्पिटल इस्लामपुर येथे उपचार घेत असताना ऑक्सिजन अभावी व डाॅ. श्री व सौ सांगरुळकर यांच्या हलगर्जीपणामुळे कै. धोंडीराम यांच्यासह अन्य रुग्णांचा दैर्देवी मृत्यु झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्याय मिळावा अशी विनंती प्रांताधिकारी विजय देशमुख , तहसिलदार रविंद्र सबनीस व पोलिसप्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली होती. मात्र राजकीय वरदस्त डाॅ. सांगरुळकर यांच्यावर असल्याने याबाबत कोणती ही माहीती उपलब्ध होईना व निवेदनाच्या अनुषगांने चौकशी होईना म्हणुन पिडित कुटुंब माजी खा.राजु शेट्टी व वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समितीकडे न्याय मिळावा म्हणुन धावले. प्राथमिक सत्यता पाहुन उपलब्ध माहीतीनुसार लक्ष्मीनारायण हाॅस्पिटलमधील अनेक त्रुटी व रुग्णांची अर्थिक पिळवणुक हि विचार करायला लावणारी असल्याने माजी खा. राजु शेट्टी पिडीत कुटुंबासह थेट जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांच्या दालनात पोहचले. व डाॅ. सांगरुळकर यांच्या कारभाराचा पाढा वाचला. कोणत्या ही राजकिय लोकप्रतिनिधी च्या दबावाला बळी न पडता या प्रकरणाची चौकशी होऊन डाॅ. सांगरुळकर यांचे कोविड हाॅस्पिटल बंद करावे. त्यांचे वैद्यकीय सेवेचे प्रमाणपत्र रद्द करुन योग्य ती कारदेशीर कारवाई करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधा चा गुन्हा दाखल करुन पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा हाॅस्पिटल व प्रशासन विरोधात सर्वपक्षीय मोठा लढा उभारतील असा इशारा माजी खा. राजु शेट्टी व वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी दिला.

यावेळी कै. धोंडीराम यांच्या पत्नी श्रीमती रुपाली म्हणाल्या माझे पती कै. धोंडीराम यांच्या मृत्युस पुर्णत: डाॅ. सांगरुळकर व सर्व स्टाफ असुन त्यांच्या पत्नी डाॅ. नैनिता सांगरुळकर या फाईल मागायला गेले असता अंगावर धावुन आल्या व आम्हांला हाकलुन लावले. तुला काय करायचे कर म्हणत आमच्यावरच इस्लामपुर पोलिसात गुन्हां नोंद करण्यात आला. पोलिस ठाण्याच्या आवारात या डाॅ. महिलेने मला अपमानस्पद शब्द वापरुन अवमानीत केले. मी लढा शेवटपर्यत लढणार असुन समाजाने माझ्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी पुढे यावे तर प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन न्याय द्यावा अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते शाकीर तांबोळी,भाजपाचे चंद्रकांत पाटील, मनसे चे सनी खराडे, स्वाभिमानी संघटनेचे मकरंद करळे, ॲड. शमशुद्दीन संदे, मराठा क्रांती संघटनेचे दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर आदिसह अन्य मान्यवर, पिडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments