Daily Mahasatta

Daily Mahasatta

सहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

कवठेमंहकाळ (अभिषेक साळुंखे) : हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करिता सहा हजार रुपयांची लाच घेताना तलाठी रामु पांडुरंग कोरे (वय ४३ ) तिसंगी, ता. कवठेमहांकाळ सांगली लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज मंगळवार ता. ११ रोजी तिसंगी ता. कवठेमंहकाळ येथे करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे आजोबांनी तक्रारदार व त्याची आई यांचे नांवाने केलेल्या बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करीता तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथिल तलाठी रामु कदम यांनी तक्रारदार यांचेकडे नऊ हजार रूपयेची लाच मागितली असल्याबाबत तक्रार दिली होती.

या तक्रारीचीकाल ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती सहा हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम मंगळवार ११ रोजी घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी कार्यालय तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथे सापळा लावला असता रामु पांडुरंग कोरे (वय ४३ वर्ष,) तलाठी, तिसंगी, ता. कवठेमहांकाळ, यांने तक्रारदार यांचेकडून सहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई श्री. सुजय घाटगे साो पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली, श्री.
प्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक, श्री गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार पोहेकों
संजय संकपाळ, पो. ना. धनंजय खाडे, प्रितम चौगुले, चालक पोना पवार यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments