Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यु : सरपंच मिनाक्षीताई महाडिक

पेठ (रियाज मुल्ला) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पेठ ता. वाळवा येथे आज गुरुवार दिनांक 6 ते गुरुवार दिनांक 13 पर्यंत 8 दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन पेठ ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती व पोलीस प्रशासन यांचे वतीने करण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत सरपंच श्रीमती मिनाक्षीताई महाडिक, जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच चंद्रकांत पवार, सहा. पो. नि. अनिल जाधव, पेठ बिटचे पोलीस हवलदार श्रीकांत अभंगे, हवलदार दीपक भोसले , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनपाल माळी, गावकामगार तलाठी मुलाणी, मंडल अधिकारी शेळके, पेठ आरोग्य केंद्राच्या अधिकारी सौ. अर्चना कोडग, ग्रामविकास अधिकारी एम .डी. चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ. वसुधा दाभोळे, माजी उपसरपंच अमीर ढगे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दाइंगुडे व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.

सदरच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असून आरोग्य सेवा, मेडिकल दुकान आदींना परवानगी असून यांनी नियमावलीचे पालन करावेत. दूध डेअरी व दुध विक्रेत्यांना 7 ते 9 वाजेपर्यंत संकलन व वितरणाची मुभा राहणार आहे. इतर सर्व दुकाने या कालावधीत बंद राहणार असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments