Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यास पुरेशा लसी देणार : आरोग्य मंत्री

सांगली :  काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी जिल्ह्यास लस जादा प्रमाणात मिळण्याच्या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले.

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यास कोरोना प्रतिबंधक लसी जादा प्रमाणात द्याव्यात, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनही पुरेशा प्रमाणात द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. मंत्री टोपे यांनी पुरेशा लसी देऊ अशी ग्वाही पाटील यांना दिली.

पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत टोपे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना या वेळी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज दोन हजारच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मृत्यू होणार्‍यांची संख्या 40 ते 50 आहे. रग्णांना बेड मिळताना मुश्कील होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे लसीकरण होणे आवश्यक आहे. 

सद्या लसीकरण मंद गतीने सुरु आहे. लसींचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम खंडीत होत आहे. चार- पाच दिवसांनी 20 ते 25 हजार लसी कशाबशा मिळत आहेत. त्या एका दिवसात संपत आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रावर लोकांच्या रांगा लागत आहेत. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत आहेत. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणे मुश्कील होत आहे. याचा त्रास आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच होत आहे. सध्या लाट ओसरत आहे. परंतु तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात लसीकरण होणे गरजेचे आहे. यामुळे जिल्ह्यातील संसर्ग व मृत्यू संख्या कमी होईल. जिल्ह्याचा विचार करता जादा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.

जिल्ह्यात सध्या दोन हजारच्या आसपास गंभीर रुग्ण आहेत. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन लागत आहेत. पण त्याचा पुरवठा अपुरा होत आहे. यासाठी नातेवाईकांची परवड होत आहे. त्यामुळे सध्या दररोज 500 इंजेक्शन मिळत आहेत, ती एक हजारपर्यंत वाढविण्यात यावीत, अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments