Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा देवांग समाजाच्या शिबिरात १३४ रक्तबाटल्या संकलन

विटा (प्रतिनिधी) : विट्यातील देवांग समाज युवा फौंडेशन व समस्त देवांग समाजाच्यावतीने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात १३४ रक्तबाटल्या संकलित झाल्या. कोरोनाची पार्श्वभुमीवर सामाजिक अंतर, हॅंड सॅनिटायझर, हात धुण्याचे व्यवस्था, परीसर सॅनिटाईजर, डिस्पोजेबल बेडशिटस व हातमोजे वापरुन शिबिर संपन्न झाले. यावेळी रक्तदात्यांना देवांग फौंडेशनच्या वतीने वतीने वेपोराईजर मशिन, सॅनिटायझर व मास्क भेट देण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभुमीवर रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने निर्माण झालेले रक्तटंचाई तसेच आता १८ वर्षापुढील तरुणांचे सुरु झालेले लसीकरण व त्यानंतर किमान ३० दिवस रक्तदानावर आलेले निर्बंध पहाता कदाचित जुननध्ये आणखी रक्तटंचाई होऊ शकते. या गोष्टींचा विचार करुन हे शिबिर आयोजित केले होते. या पार्श्वभुमीवर विटा देवांग समाजाच्या आवाहनास विटेकरांनी व विशेषत: तरुणांनी व तरुणींनीही उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने हा सामाजीक उपक्रम यशस्वी झाला. 

सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या सर्वांचे देवांग समाजाच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत. रक्तसंकलनाचे काम आदर्श ब्लड बॅंक सांगली यांनी केले. यावेळी किरण तारळेकर, माधव रोकडे, विपुल तारळेकर, निलेश दिवटे, अनिल म. बाबर, अविनाशनाना चोथे , कुमार लोटके, सुरेश म्हेत्रे, विकास फासे, राम तारळेकर, देवेंद्र म्हेत्रे, युवा फौंडेशन अध्यक्ष सुयश म्हेत्रे, प्रथमेश आमने, हर्षल तारळेकर, प्रथमेश चोथे, हर्ष म्हेत्रे, रमणीक दिवटे, निखील म्हेत्रे, अनिश म्हेत्रे, हर्षल तारळेकर, दर्शन तारळेकर, अथर्व उबाळे, अथर्व लोटके, संजित दिवटे रक्तदातामित्र महेश फासे याच्यासह देवांग युवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments