Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ई - पास साठी कोविड चाचणीची गरज नाही : जिल्हा पोलीस अधिक्षक

सांगली (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाची ब्रेक द चेन चे निर्बंध लागू आहेत व अंमलात आहेत. त्याअनुषंगाने अंतरजिल्हा हालचालीवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची ई-पास ची गरज नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज आहे तर त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. ई-पास साठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या कोविड निगेटीव्ह रिपोर्ट ची आवश्यकता नाही. ई-पास साठी अर्ज करताना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही डॉक्टरचे कोविड-19 ची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments