Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंना मदत, नगरसेवक केदार नलवडे यांचा आदर्श उपक्रम

शिराळा (विनायक गायकवाड)
शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक केदार नलवडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंना मोठ्या प्रमाणात केलेली मदत समाजापुढे चांगला आदर्श निर्माण करणारी असल्याचे मत तहसीलदार गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.

शिराळा शहरातील १०० गरजू कुटुंबांना व नगरपंचायत सफाई कामगार यांना अन्नधान्य किट वाटप प्रसंगी ते बोलत होते. मुख्याधिकारी योगेश पाटील, विनायक गायकवाड, राम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, कोरोना काळात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून दातृत्व दाखवत अनेक मंडळी पुढे येत आहेत. त्यापैकी नगरसेवक केदार नलवडे यांनी मोठ्या प्रमाणात केलेली मदत उपयुक्त आहे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून असे सामाजिक योगदान दिले पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयातून काम केल्यास कोरोना हद्दपार करण्यासाठी मदत होईल. नगरसेवक केदार नलवडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे. असाच पुढाकार घेऊन अन्य मंडळीनी देखील पुढे यावे. आपापल्या परीने जमेल त्या ठिकाणी मदत करावी. एकमेकांना सावरण्यासाठी मदत म्हणून नव्हे तर सामाजिक कर्तव्य पार पाडावे.

मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, समाजातील दुर्लक्षित घटकांना योग्य आणि गरजेच्या वेळी न्याय देण्याचे काम नगरसेवक केदार नलवडे यांच्या माध्यमातून होत आहे. कोरोनोच्या महामारीत जबाबदारी ओळखून गरजूंना मदत करण्याचे काम नगरसेवक केदार नलवडे यांच्या माध्यमातून होत आहे. हि बाब समाधानकारक आहे. राजकारणा बरोबर सामाजिक कार्यात सहभागी होऊन त्यांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. इतरांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरजूंना योग्य वेळी मदत करावी. कोरोना काळात विविध संस्था व व्यक्ती पुढे येऊन मदत करत आहेत. त्यांचे योगदान अशावेळी महत्त्वाचे ठरत आहे.

यावेळी हारुण शेख, राहुल खबाले, सौरभ नलवडे, सुरेश शेळके, भूषण पाटील, बाजीराव नलवडे, सचिन दिवटे, वैभव इंगवले, स्वप्नील दिवटे, अभिषेक हसबणीस, अभिमन्यू नलवडे, प्रतीक हसबनीस, प्रथमेश गायकवाड, मोहसीन नालबंद, प्रथमेश शेटे, चेतन शिंत्रे, बाळकृष्ण घाडगे आदी उपस्थित होते.
---------------------------------,

गरजू कुटूंबाला भाजी
विक्रीसाठी दिला हातगाडा


येथील कीर्तनकार हरी कदम यांच्या कुटुंबाची गरज ओळखून त्यांना भाजीपाला विक्रीसाठी १२ हजार रुपये किमतीचा हातगाडा तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये प्रदान केला. तसेच कोविड सेंटर मध्ये फळांचे वाटप केले.

Post a Comment

0 Comments