Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यात कोरोना कहर

शिराळा (विनायक गायकवाड) : तालुक्यातील २९ गावात आज ८३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असून प्रशासनावरील ताण वाढवणारी आहे.

आंबेवाडी, भाष्टेवाडी, फुफिरे, हातेगाव, कांदे, माळेवाडी, पाडळी या गावात प्रत्येकी १ रुग्ण, बादेवाडी, बांबरवाडी, बिऊर, खवरेवाडी, खेड, मानेवाडी, पाडळेवाडी, पणुब्रे वारून, शेडगेवाडी, शिरशि, या गावात प्रत्येकी २ रुग्ण, भटवाडी, जांभलेवाडी, मणदुर, तडवळे, विरवाडी, वाकूर्डे बु., या गावात प्रत्येकी ३ रुग्ण, लादेवाडी, मांगले, प. त. शिराळा या गावात प्रत्येकी ४ रुग्ण, चरण आणि सागाव मध्ये प्रत्येकी ७ रुग्ण तर शिराळा शहरात आज ११ रुग्णांची नोंद झाली आहे.

दररोज वाढणारी ही आकडेवारी पाहता चिंताजनक आहे. सध्या आरोग्य यंत्रणा जरी पुरेशी असली तरी दररोज रुग्ण संख्या अशीच वाढत गेली तर मात्र नजीकच्या काळात आरोग्य यंत्रणा आणि पर्यायाने प्रशासकीय व्यवस्था यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील पोलिस व स्थानिक पातळीवरील यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन वारंवार केले जात आहे.

Post a Comment

0 Comments