Daily Mahasatta

Daily Mahasatta

पंचवीस वर्षापासून रखडलेल्या ड्रेनेजचे काम अंतीम टप्प्यात

 महापौर व आयुक्त यांचेकडून कामाची पाहणी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील वॉर्ड क्र. १७ मधील, मंगलमूर्ती कॉलनी गल्ली नं. २ मध्ये पारेख बंगला ते त्रिमूर्ती पोलीस चौकी पर्यंत भूयारी गटार योजना टप्पा क्र. २ मधून दक्षिण-उत्तर रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या अंतीम टप्यातील कामाची महापौर श्री. दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी व आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. 

यापूर्वी या भागात जवळजवळ २ किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकून झाली आहे. शंभर फुटी रस्त्यालगत असणाऱ्या पोलीस चौकी पर्यंत चेंबरही बांधले गेलेले होते. परंतु शंभर फुटी रोडलगत असणारी भोबे गटार खोलवर असल्यामुळे पुढील ड्रेनेज लाईन टाकणे अवघड झाले होते. त्यामुळे काम थांबले होते. या समस्येवर मा. महापौर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून तोडगा काढला तसेच या प्रश्नी आयुक्त यांनीही कामास लगेच मंजुरी दिली.

त्यानुसार ड्रेनेज जोडण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. पोकलॅण्डद्वारे १५ फूट हून अधिक खोलीवर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे. भोबे गटारी खालून सदर ड्रेनेजची पाईप लाईन टाकून लवकरच काम पूर्ण होईल, असे एसएमसी इन्फ्रा चे श्री. प्रसाद जोशी यांनी सांगितले. सदर काम पूर्ण झाल्यावर मंगलमूर्ती कॉलनी, पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट या भागातील नागरिकांचा ड्रेनेज चा प्रश्न कायमचा मिटणार आहे. काम पूर्णत्वास जात असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments