Daily Mahasatta

Daily Mahasatta

भवानीनगर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, नागरीकांचे हाल तर प्रशासनाचे दुर्लक्ष

वाळवा (रहिम पठाण)
भवानीनगर ता. वाळवा येथील वाॕर्ड नंबर तीन मधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर नागरीकांची रहदारी सतत असते आणि पावसामुळे जागोजागी खड्यांमध्ये पाणी साचत आहे तर रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सध्या अवकाळी पावसामुळे हे हाल होत आहेत तर पावसाळा सुरु झाल्यानंतर याही पेक्षा बिकट परीस्थितीला नागरीकांना सामोरे जावे लागेल यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेत लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
------------------------
जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे

वार्ड नं.3 मधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात गेले तीन वर्ष ग्रामपंचायतीकडे अर्ज व तोंडी विनंती करुन ही ग्रामपंचायत सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यानी चौकशी करावी.

-राहुल वाकळे,
युवक काँग्रेस सरचिटणीस
इस्लामपूर विधानसभा

Post a Comment

0 Comments