Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिकेच्या बदनामी प्रकरणी प्रांताधिकार्‍यांचा खुलासा

विटा (प्रतिनिधी) : येथील जीवनधारा कोव्हीड हॉस्पीटल मध्ये बिलाची आकारणी कशी होते, हे पाहण्याची जबाबदारी शासकीय ऑडीटरची होती. मात्र त्यांनी काम वेळेत न केल्याने किंवा कोणता दर लावावा या बाबती मध्ये संभ्रम असल्याने बिल आकारणीत अनियमितता झाली. मात्र तहसीलदार साहेबांच्या मुलाखतीचा विपर्यास करून विटा नगरपरिषदेची नाहक बदनामी करण्यात आली आहे. याबाबत आपण प्रशासन म्हणून योग्य खुलासा करावा, अशी मागणी विटा नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी प्रांताधिकारी संतोष भोर यांच्याकडे आज केली.

विटा नगरपरिषद संचलित जीवनधारा कोव्हीड हॉस्पीटल मध्ये जादा दराने बीलांची वसूली करण्यात आल्याची तसेच जादा वसूल केलेली सुमारे 11 लाख 84 हजार रूग्णांना परत करण्याचे आदेश जीवनधारा हॉस्पीटलला देण्यात आल्याची माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आज विटा नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी प्रांताधिकारी संतोष भोर यांची भेट घेऊन हा संभ्रम दूर करत प्रशासनाच्यावतीने खुलासा करण्याची मागणी केली. विटा नगरपरिषद संचलित जीवनधारा कोविड सेंटर बाबतीमध्ये विटा नगर परिषदेची विनाकारण झालेल्या बदनामी बाबत प्रांताधिकारी यांना नगरसेवकांनी निवेदन दिले. 

शासनाने जाहीर केलेल दर पत्रककामध्ये जनरल वार्ड मधील विलगीकरण बेडसाठी 4000 तर ऑक्सिजन आयसीयू बेडला 7500 रुपे प्रति दिवसाकरता आकारणी करावी या सूचनेनुसार जीवनधारा व्वस्थापनाने सर्व बेड ऑक्सिनेटेड असल्याने 7500 रुपये प्रतिदिन प्रमाणे व करारातील शर्तीनुसार 15 टक्के सूट देऊन आकारणी सुरू केलेली होती व नियमानुसार त्यांनी दररोजची बीले शासनाने नेमलेल्या ऑडिटर यांच्याकडे दाखल केल्याचे या निवेदनात म्हंटले आहे. या संपूर्ण प्रकरणातून झालेल्या गैरसमजाबाबत खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक किरण तारळेकर, फि’रोज तांबोळी, सुभाष भिंगारदेवे, राहुल हजारे, विशाल तारळेकर, अविनाश चोथे, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे, प्रताप सुतार, ज्ञानेश्वर शिंदे, भरत कांबळे, निलेश दिवटे, विनोद पाटील उपस्थित होते.

प्रांताधिकारी यांचा खुलासा 
शासकीय ऑडीटरच्या चुकीमुळे संभ्रम : प्रांताधिकारी

नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर काहीवेळातच प्रांताधिकारी संतोष भोर यांनी प्रशासनाच्यावतीने खुलासा करत संभ्रम दूर केला. जीवनधारा कोव्हीड हॉस्पीटल मधील शासकीय ऑडीटरने योग्यवेळी माहिती न दिल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. वस्तूतः शासकीय ऑडीटर यांना देखील कामाचा ताण आहे. बीलाची आकारणी चुकीच्या पध्दतीने झाल्याचे लक्षात आणून देताच संबंधित रूग्णालयाने त्या रूग्णांना पैसे देखील परत केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पालिका प्रशानाचा कोणताही गैरहेतू नव्हता, असा स्पष्ट खुलासा प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केला आहे. 

Post a Comment

0 Comments