Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातील राष्ट्रवादीच्या गुंडांनी सभागृहाच्या पावित्र्यावर बोलू नये : वैभव पवार

इस्लामपुर (हैबत पाटील) : गेल्या ३१ वर्षात ज्यांनी काय केले नाही त्यांनी चुकीचे व खोटे आरोप करु नयेत. राष्ट्रवादीचा बालनेता म्हणून ओळख असलेल्या शहाजी पाटील व गुंड वृत्तीच्या खंडेराव जाधव यांनी नगरपालिका सभागृह पावित्र्याबद्दल बोलु नये, असा पलटवार विकास आघाडीच्या वैभव पवार यांनी आज केला आहे. 

काल राष्ट्रवादीने विकास आघाडीवर व नगराध्यक्ष यांच्या कारभारावर टीका केली होती त्याला उत्तर देताना ते म्हणाले, राष्ट्रवादीचा डाव हा रडी चा डाव आहे. गेल्या चार साडेचार वर्षात शहर विकासासाठी ११५ कोटीहुन अधिक निधी विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेनेने आणला. शहरवासियांना गेली ३१ वर्षे आपण खोटे बोलुन विकासकामांची दाखविलेली स्वप्ने खर्‍या अर्थाने आम्ही पुर्ण केली व काही पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आपण जरा घरातुन बाहेर येऊन शहरात फिरा म्हणजे समजेल. लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) व त्यांच्या सहकार्‍यांनी सभागृह अत्यंत पारदर्शी चालविले आहे, ते संपुर्ण शहर व महाराष्ट्र देखील पहात आहे.,आपला मनमानी व दंडुकशाही कारभार चव्हाट्यावर आल्याने आपल्यातील अनेक चेहरे बदनाम झाले. यामुळेच चुकीची विधाने करुन शहरवासियांची दिशाभुल करण्याचा हा असफल प्रयत्न आहे. ३१ वर्षे नगरपालिका सत्ता, सप्तपदी आमदार पद असुन ही शहरातील विकास कामाची बोंब ठोकणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणण्याची वेळ शहरवासियांच्यावर आली आहे, असा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक वैभव पवार यांनी राष्ट्रवादीवर केला.

यावेळी बोलताना वैभव पवार म्हणाले सलग ३१ वर्षे शहरावर सत्ता अबाधित ठेवणार्‍या राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकारी व सप्तपदी आमदार म्हणून निवडुन येणार्‍या नेतृत्वाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदु मानुन व माझं शहर म्हणुन काम केले असते तर एकही विकासचे काम शहरात राहीले नसते,शहराची बारामती करण्याच्या घोषणा केल्या आणि सत्ता मिळाली कि बारामती विसरुन करामती करण्यात व्यस्त असणार्‍या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी, अकार्यक्षम नगरसेवक व राष्ट्रवादी मध्ये बालनेता म्हणुन ओळख असणार्‍या शहाजी पाटील यांनी शहराच्या विकासकामाबाबत बोलु नये. शहराने आपणांस भरपुर संधी दिली. 

सत्तेचा वापर स्वहितासाठी व स्वविकासासाठी केला,नगरपालिकेच्या मालकीच्या मोठ -मोठया इमारती काडीमोलदराने भाडेतत्वावर घेऊन नगरपालिकेचा अर्थिक तोटा केला हे सर्व तालुक्याला ज्ञात झाले आहे,लवकरच अशा अनेक गोष्टी आम्ही प्रकाशात आणणार आहोत,शहरवासियांसमोर जाहीरपणे मांडणार ही आहोत यामुळे दुसर्‍यावर बुनबुडाचे आरोप करताना आपण किती स्वच्छ,निर्मळ आहोत हे पहाण्याची गरज आहे,आवश्य तुम्ही आरोप करा पण त्याची सत्यता पाहुन ,रास्त माहीती घेऊन करा,प्रसिध्दीसाठी,स्टंटबाजीसाठी व शहरवासियांची तात्पुरती दिशाभुल करण्यासाठी करु नका. 

आपले व्यक्तीमत्व तपासा मगच आरोप करा. भुयारी गटर चे काम हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच सातत्याने विरोध करुन थांबविले. १५ कोटीच्या निधीबाबत सभा बोलविली तर आपणच सदरची सभा रद्द करण्याबाबत पिठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांना पत्र दिले.,आम्ही विरोधच केला नाही याउलट तुम्हीच विरोध केला आणि कागदोपत्री नगरपालिकेच्या खात्यावर गेल्या दिड वर्षात मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातुन शहराच्या विकासकामासाठी किती निधी आणला हे ही एकदा पुराव्यासह दाखवा. आमची सत्ता आल्यापासुन महापुर आला. जिल्हापरीषद, पंचायत समिती, लोकसभा, विधाससभा, पदविधर या निवडणुकांची आचारसंहिता झाल्या.,पहील्या टप्यात कोरोना उपाययोजना झाली, आता कोरोनाचा दुसरा टप्पा आला. याचबरोबर आपला विकासकामांना विनाकारण विरोध हा सर्व वेळ जाऊन उर्वरीत मिळालेल्या वेळेत शहरवासियांचे हित जपण्याबरोबर शहराचा विकास साधण्यात विकासआघाडी व मित्रपक्ष शिवसेना यशस्वी ठरली आहे.

शहरवासियांच्या समोर जाण्यासाठी आपल्या कोणतेही माध्यम नाही.,आपल्या सत्ताकाळातील कारभार हा चव्हाट्यावर आल्याने आपण बदनाम झाला आहात, म्हणुन दुसर्‍यावर खोटे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचा हा डाव कधी ही साध्य होणार नाही. सभागृहातील कामकाज शहरवासियांना समजावे म्हणुन थेट प्रेक्षेपणाची कल्पना लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचीच होती कारण शहरवासिय व शहरातील जनता ही सुज्ञ आहे,त्यांना सभागृहातील कामकाजाची पारदर्शी कारभाराची माहीती मिळावी व त्यांना त्याचा तो हक्क आहे तो मिळायला हवा असा कारभार करुन ही तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही व्देषापोटी आरोप करत आहात हे स्पष्ट होत आहे 

शहरावर कोरोनाचे संकट आहे. रुग्ण,नातेवाईकांची अक्षरशा: फरफट होते,यासाठी आपण व आपले सप्तपदी आमदार यांनी ठोस असे काय केले,उलट जे चांगले काम करतात त्याच्याबद्दल तक्रारी व ज्याच्याबद्दल तक्रारी प्रशासनाकडे आल्यात त्याच्याबद्दल ब्र ही शब्द नाही,म्हणजे आपले चुकीच्या कामाला खतपाणी आणि चांगल्या कामाला विरोध असे राजकारण आम्ही सहन करुन घेणार नाही व शहरवासिय ही घेणार नाहीत असा इशारा शेवटी वैभव पवार (दादा) यांनी दिला.

*गुन्हेगारांने व अकार्यक्षम पुढार्‍याने पावित्र्याबद्दल बोलु नये.*
सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही, खोटे व चुकीचे बोलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीत बालनेता म्हणुन ओळख असणार्‍या व स्वत:अकार्यक्षम आहे असे सभागृहात जाहीरपणे सांगणार्‍या शहाजी पाटील यांनी व नगरपालिकेच्या तात्कालीन महिला मुख्याधिकारी यांनी कोरोना लाॅकडाऊन काळात अवैध दारू साठ्यावर कायद्याचा बडगा उगारल्याच्या रागातुन थेट महीला मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांना जाब विचारत त्यांच्या अंगावर खुर्ची घेऊन जाणार्‍या गुंड वृत्तीच्या खंडेराव जाधव यांनी नगरपालिका सभागृहातील पावित्र्याबद्दल बोलु नये व चुकीचे व खोटे आरोप ही करू नये. आपली शहरातील लोकांना चांगली ओळख आहे ती काय म्हणुन आहे हे सर्वाना ज्ञात आहे. ,शहरात अनेक चांगले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. मात्र काहीच्या दहशतीमुळे व योग्य न्याय मिळत नसल्याने ते लोकासमोर येत नाहीत, त्यांना राष्ट्रवादीने संधी द्यावी, सप्तपदी आमदार जयंत पाटील यांनी खंडेराव जाधव यांच्यासारख्या गुंडवृत्तीच्या लोकांना पुढे करुन शहरात दशहत माजविण्याचा व शहरवासियांना भयभित करण्याचा प्रयत्न करु नये, अशा विकृत विचाराचे राजकारण शहरवासिय कधी ही चालु देणार नाहीत, असा ही खणखणीत इशारा वैभव पवार यांनी दिला.

Post a Comment

1 Comments

  1. Superb Vaibhav....kar nahi tyala dar kashachi...please keep the good work going....very very proud of you brother....

    ReplyDelete