Daily Mahasatta

Daily Mahasatta

तहसीलदार, तुम्हीच आहात साक्षीदार : अभिजित पाटील

इस्लामपूर (हैबत पाटील) : प्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणा मध्ये राजकीय दबावामुळे च पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, या सर्वाचे साक्षीदार तहसीलदार आहेत असे मत कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत व्यक्त व्यक्त केले.

आम्हाला या प्रशासनाने कोणतेही सहकार्य केलेले नाही. तरीही आमच्यावर ॲट्रॉसिटी का ? असा प्रश्न उपस्थित करत आज पर्यंत हॉस्पिटलमध्ये १५०० कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. हे उपचार करताना आमच्या तीन डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे, असे ॲट्रॉसिटी ची खोटी तक्रार देणारा फिर्यादी कधीही हॉस्पिटलकडे आलाच न्हवता. त्या रुग्णाला त्याच्या नातवाने ऍडमिट केले होते. तहसीलदार या घटनेचे साक्षीदार आहेत.

येथील प्रकाश हॉस्पिटल मधील डॉक्टरांसह पाच जणांच्या वर पोलिसांनी ॲट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा राजकीय दबावामुळे केला गेला आहे असा दावा अभिजित पाटील यांनी केला आहे .

दवाखान्यातील झालेल्या बिलावर शासकीय ऑडिटरच्या सह्याअसताना व या बिलाबाबत कोणतीही तक्रार नसताना रूग्णाच्या नातेवाईकांनी लेखी दिले असून सुद्धा याला तहसीलदार साक्षीदार आहेत. तरीही पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हा खोटा गुन्हा दाखल केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला .

पोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाने मृत पावलेल्या संबंधित रुग्णांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात देण्याचा हट्ट करत होते . परंतु शासकीय नियमानुसार कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात देता येत नाही. यामुळेच वाद झाला होता. या सर्व प्रकाराचे तहसीलदार साक्षीदार आहेत . पण ते आता यावर बोलत नाहीत. अभिजित पाटील म्हणाले , तक्रार देणारा हा कधीही हॉस्पिटलकडे आलेला नाही . पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करणार आहे . प्रकाश हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविड रुग्णासह सर्व रुग्णांची आता प्रशासनाने जबाबदारी घ्यावी . येथील प्रशासन दबावाखाली काम करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. यावेळी उपाध्यक्ष सुजित पाटील , सचिव कुलदीप खांबे , हिम्मत जाफळे, विश्वजीत गिरीगोसावी, धनंजय धामणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments