Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता भाजपाची टास्क फोर्स, पहा कसे असेल कामकाज

इस्लामपुर (सूर्यकांत शिंदे ) : सध्या संपुर्ण महाराष्ट्रभर कोरोनाचा प्राद्रुर्भाव वाढला असुन रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय व फरफट लक्षात घेऊन केंद्रीय स्तरावरुन आलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कोविड टास्क फोर्स कार्यरत झाला असुन हा फोर्स आता प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीला धावणार आहे, याबाबत आज पश्चिम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्याची व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उरुण- इस्लामपुरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांची सांगली जिल्हा भाजपा कोविड टास्क फोर्स च्या समन्वयक पदी निवड केली.

यावेळी भाजपा प्रदेश चे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राज्याचे भाजपा कोविड टास्क फोर्स प्रमुख जयप्रकाश ठाकुर, आयटी संयोजक सतिश निकम यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सध्य परिस्थितीत रुग्णांना बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, औषध, रेमडेसिव्हर इंजेक्सन, प्लाझ्मा आदि अत्यावश्यक सेवेतील गोष्टी असुन या प्राधान्याने सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याबरोबर रुग्ण व नातेवाईक यांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्याचे नियोजन भाजपा कोविड टास्क फोर्स च्या वतीने करण्याबाबत चर्चा झाली. युवकांचे रक्तदान शिबीराचे ही नियोजन करुन या संकट काळात राष्ट्र प्रथम या विचाराने कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी मदतीसाठी जिल्ह्यानुसार सात लोकांची कमिटी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला असुन हा नंबर प्रत्येक शहरापासुन गावा-गावांत, खेड्यात वस्तीपर्यत पोहचवुन या संकट काळात एक देशसेवक म्हणुन काम करण्याबाबत निर्णय झाला.

यावेळी निशिकांत भोसले- पाटील यांनी जिल्ह्यातील सध्य परीस्थिती ,रुग्ण व नातेवाईकांची होत असलेली गैरसोय ची मांडणी करुन प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर च्या माध्यमातुन कोविड रुग्णांसाठी सुरु असलेल्या कामाचा आढावा दिला. जिल्ह्यातील रुग्णांसाठी भाजपा टास्क फोर्स ची रचना करण्यात आली असुन कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन कोविड रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांचा आढावा सांगितला.

यावेळी सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,संघटन सरचिटणीस मिलींद कोरे,सरचिटणीस सुरेंद्र चौगुले,सांगली जिल्हा परीषदेचे अध्यक्ष प्राजक्तता कोरे, डाॅ. रविंद्र आरळी, दिपक शिंदे, डाॅ. भालचंद्र साठे, वाळवा तालुका भाजपा चे अध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments