Daily Mahasatta

Daily Mahasatta

पृथ्वीराज फौंडेशनकडून कोविड प्रतिबंधक औषधांचे किट वाटप

सांगली (प्रतिनिधी) : बिसूर येथे शनिवारी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे किट वाटप करण्यात आले.

सांगली, (प्रतिनिधी) : गुलाबराव पाटील हॉस्पिटल मिरज आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्यावतीने बिसूर येथे औषधांचे किट सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले. 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही औषधे महत्त्वाची आहेत. गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी हे किट देण्यात आले. गेल्या वर्षीही या किटचे वाटप मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. 

श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज बिसूर येथे कोरोना परिस्थितीची माहिती घेतली, तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्राची पाहणी केली.

यावेळी सरपंच लीलावती पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, किरण पाटील, सुवर्णा कोळी, सतीश निळकंठ, पोलीस पाटील सतीश पाटील, मारुती कोळी, व्यंकट भगत, विजय प्रतापराव पाटील, टी. डी. पाटील, विजय पाटील, रणजीत पाटील, शैलेश चव्हाण, नितीन भगत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments