Daily Mahasatta

Daily Mahasatta

काटेवाडीच्या तलावात टेंभू चे जादा पाणी सोडावे; चिंचणी (म.) ग्रामस्थांची मागणी

विटा (प्रतिनिधी) : चिंचणी ता. खानापूर येथे टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन ने काटेवडा तलावात सोडले जाते. मात्र या तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची रुंदी लहान असल्यामुळे पाण्याचे आवर्तन सुटून सुद्धा तलावात पाणी पुरते येत नाही. त्यामुळे या पाण्यावर केलेली पिके हि आता वाळू लागलेली आहेत.

तरी या पाईपची रुंदी वाढवावी किंवा जादाचे पाणी तलावात सोडावे म्हणजे पिकाला पाणी पुरेल, अशी विनंती चिंचणी ग्रामस्थांनी पालकमंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांचे केली. यावेळी बाबासाहेब मुळीक, मा वैभव पाटील, संदीप मुळीक, सरपंच विजय निकम, उपसरपंच राजू पाटील, सदस्य प्रताप निकम, अनिल निकम, लक्ष्मण निकम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments