Daily Mahasatta

Daily Mahasatta

सर्पदंशाने मुलाचा मृत्यू, कुटुंबाला ७५ हजारांची मदत

हिंगणगाव (बु.) : येथील मृत अक्षय कदम यांच्या कुटुंबियांना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांचे हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी हणमंतराव कदम, महेश कदम व अन्य मान्यवर

कडेगांव ( सचिन मोहिते) : हिंगणगाव बुद्रुक ( ता. कडेगांव) येथील अक्षय दादासो कदम या मुलाचा काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा या योजनेतून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या प्रयत्नातून मृत अक्षय कदम यांच्या कुटुंबियांना ७५ हजार रुपये मंजूर झाले. आज दि. १९ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम (भाऊ) देशमुख यांच्या हस्ते ७५ हजार रुपयांचा धनादेश नुकताच त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की , कोरोना महामारीने अगोदरच नागरिक अडचणीतून संघर्षाचे जीवन जगत आहेत. त्यातच अक्षय दादासो कदम या मुलाचा काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्यांने कदम कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र प्रयत्नशील राहून सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी महेश कदम व्हा. चेअरमन सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या. कडेगाव, हणमंतराव कदम (संचालक केन ऍग्रो एनर्जी इंडिया लि. रायगाव), संजय यादव (व्हा. चेअरमन स्कुल कमिटी), नवनाथ शिंदे (माजी सरपंच),आनंदराव यादव (संचालक महालक्ष्मी मागासवर्गीय सहकारी सूतगिरण), शिवाजी कदम (माजी चेअरमन हिंगणगाव बु. सोसायटी), संतोष कदम (उपाध्यक्ष कडेगाव तालुका भाजपा), बबन महाराज, वैभव कदम, सिद्धार्थ माने, मयूर कदम, मंगेश कदम, अनिल कदम, संकेत कदम, दिपक पवार, सचिन कदम, संदीप महाडिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments