Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ११६९ रुग्ण कोरोना मुक्त : आज २०४६ नवीन रुग्ण

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ११६९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, तर आज २०४६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक सुरू असून आज सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मिरज तालुक्यात २८६ तर वाळवा तालुक्यात २८० सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सद्या १६ हजार ७२४ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी - २१८, जत -२६५, कडेगाव- ८९, कवठेमंहकाळ- ९२, खानापूर -२२७ , मिरज - २८६, पलूस - ९१, शिराळा- ६५, तासगाव- १३६, वाळवा - २८० आणि सांगली शहर -१५६, मिरज शहर -१४१ असे एकूण २०४६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात ११६९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

Post a Comment

0 Comments