Daily Mahasatta

Daily Mahasatta

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड

सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. नाकाबंदी तसेच इतर कारवाईच्यावेळी पोलिसांना कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला मिळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करावी. तसेच त्या व्यक्तींच्या ताब्यातील वाहन संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असेपर्यंत किंवा केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-19 साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments