Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सांगली (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथी निमित्त संस्थेमार्फत आज रविवार दिनांक ०९/०५/२०२१ रोजी सांगली येथील कर्मवीर चौकातील कर्मवीर अण्णांच्या पुतळयास कोविड- १९ मुळे शासन नियमांचे पालन करुन मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, (सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका) संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सहा. इन्स्पेक्टर, मा. शेटे डी. के., श्री. नंदकुमार सुर्यवंशी, श्री. कणप बी. एस., श्री. मुल्ला ए. ए. अॅड. सौ. तेजस्विनी सुर्यवंशी, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग, सांगली व रयत सेवक को ऑप. बँक सांगली शाखेमधील सेवकवर्ग तसेच कर्मवीर अण्णांच्यावर प्रेम करणारे सांगली शहर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments