Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत बुधवार पासून जनता कर्फ्यु, पाहा काय बंद, काय सुरु?

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने बैठकीत जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला. बुधवार ५ मे पासून ११ मे पर्यंत मनपाक्षेत्रात कडक जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. बैठकीनंतर याबाबतची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. 

या जनता कर्फ्युमधून अत्यावश्यक सेवा , वैद्यकीय सेवा, मेडिकल आणि दूध व्यवसाय वगळण्यात आला असून अन्य सर्व आस्थापना आणि व्यवसाय हे सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णयही महापालिकेतील बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बैठकीस उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments