Daily Mahasatta

Daily Mahasatta

म्युकरमायकोसीसने सांगली जिल्ह्यात एका रुग्णाचा बळी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज म्युकरमायकोसीसने एका रुग्णाचा बळी गेला असून आतापर्यंत एकूण १०८ म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात कोरोनाचे १२८१ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर स्थिरावला असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढत आहेत. आजअखेर जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना चे १३ हजार २४९ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात १२६९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्ह्यात आज तालुकानिहाय आढळून आले ले रुग्ण पुढीलप्रमाणे आटपाडी ५२, जत १३५, कडेगाव १८३, कवठेमंहकाळ ७३, खानापूर ७४, मिरज १२८, पलूस ८४, शिराळा ११५, तासगाव १०१, वाळवा २५२ तसेच सांगली शहर १२९ आणि मिरज शहर ५५ असे एकूण १२८१ रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments