Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाटेगावातील पैलवनाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

इस्लामपूर (हैबत पाटील) : वाटेगांव ता वाळवा येथे सुकुमार संभाजी जाधव (वय 21) या नामांकित पैलवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेने वाटेगांव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लटके मळा येथे सुकुमार शेतात गेला होता. शेतात पोल्ट्री आहे. त्या ठिकाणी पोल्ट्री शेड चे काम चालू होते. त्या ठिकाणी सुकुमार लोखंडी अँगल उभा करत असताना अँगल चा धक्का बाजूनेच गेलेल्या 11 केवी च्या विजेच्या तारेला लागला व सुकुमारला जोराचा शॉक बसला शरीर यष्टी बलदंड असल्याने प्रतिकार करता करता तो तिथेच कोसळला. 

ही घटना घडताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी सुकुमार ला ताबडतोब कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची तपासणी करून वैद्यकीय सूत्रांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. सुकुमार याने अल्पावधीतच वाटेगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल केले होते. महाराष्ट्र केसरी पर्यंत धडक मारण्याचा त्याचा मनसुबा होता. कै. पै. हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबा यांचा तो पठ्ठा होता. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे सुकुमार शर्थीने तालमीचे धडे गिरवत होता. महाराष्ट्र केसरी चे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments