Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते आहार, फळ वाटप

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज रोडवरील राधा स्वामी सत्संग बियास मध्ये सांगली कोव्हिड केअर रिसोर्सेस फोरम संचालित, स्वामी विवेकानंद कोव्हिड केअर सेंटर येथील विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांसाठी महापौर श्री. दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते शक्तिवर्धक आहार-फळाचे वाटप करण्यात आले. 

सांगली विधानसभा युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष व पदमाळे गाव चे आदर्श सरपंच सचिन जगदाळे यांच्या सहकार्यातून या शक्तिवर्धक आहार-फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगळवार बाजार येथील नमराह कोविड सेंटर येथे सुद्धा कोविड रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी केळी, अंडी ,बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चे नेते मा. शेखर माने, मा. शशिकांत जगदाळे, मच्छिंद्र भोसले, मा. अभीजीत जगदाळे, मा. रुपेश कोळी, मा. विकास मदने, मा. साहिल मुलाणी, मा. सुरज चव्हाण, मा. महेश पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments