Daily Mahasatta

Daily Mahasatta

संग्रामभाऊंच्या प्रयत्नांना मोठे यश, नेवरी परिसराला मिळाली नवसंजीवनी

नेवरी : येथे नेवरी बंदिस्त पाईपलाईन वितरिकेचे पाणी पूजन करताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व अन्य मान्यवर.

कडेगाव (सचिन मोहिते) : टेंभू योजनेअंतर्गत बंदिस्त पाईप लाईन वितरीकेमुळे या परिसरातील दुष्काळ संपणार आहे. तसेच परिसराला नवसंजीवनी मिळणार आहे. या योजनेमुळे या परिसरातील चार हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येईल, असे जि. प. माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले .

टेंभू योजनेअंतर्गत नेवरी बंदिस्त पाईपलाईन वितरीका योजनेचे पाणी पूजन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी देशमुख म्हणाले, कडेगाव तालुक्यातील ताकारी, टेंभू सिंचन योजनेपासून पासून वंचित असणारा नेवरीचा पूर्व भागांमधील जनतेचा ४० वर्षापासून शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष चालू होता. पाण्यासाठी येथील जनतेला आश्वासने दिलीजात होती. प्रत्यक्षात मात्र हा परिसर पाण्याच्या प्रतीक्षेत होता. या भागावर जाणीवपूर्वक अन्याय होत होता. पाच वर्षांपूर्वी जि. प. निवडणुकीच्या वेळी भागाला भेट देण्यासाठी आल्यानंतर येथील बिरोबा मंदिर मध्ये कोणताही गट तट न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन परिसराला पाण्याची मागणी केली होती. आणि त्याच वेळी ह्या भागाला कोणत्याही परिस्थितीत पाणी देण्याचा शब्द दिला होता. आज हा दिलेला शब्द येथील जनतेच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे.

अनेक वर्षे तरतुदी विना ही योजना रखडली गेली होती. देवेंद्र फडवणीस साहेब मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मध्ये भाजपा सरकारचा बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय झाला. प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनेचा सहभाग झाला आणि या योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप आले. जि. प. अध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा खोरे अंतर्गत काम करणारे अधिकारी वर्ग व या परिसरातील शेतकऱ्यांचे पाणी प्रश्नाबाबत मीटिंग घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून मान्यता मिळाली. एकाही शेतकऱ्याची जमिन पाण्यापासून वंचित राहू नये. यासाठी प्रयत्न केले. ४२ कोटी रुपये खर्चाची १२ कि. मी. लांबी ३१५ मीटर वितरिकेच्या कामाची वर्क ऑर्डर हैदराबादच्या कोया कंपनीला मिळाली.

या परिसरातचा पाण्याचा वनवास संपला असून हे काम पुर्ण करण्यासाठी सतत पाठपुरवठा करणाऱ्या सहकाऱ्यांचे तसेच प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे, सर्व शेतकरी ग्रामस्थांचेही यावेळी भाऊंनी आभार मानले. यावेळी शिवाजी महाडीक, वसंत महाडीक, संतोष महाडीक शेठ, जगदीश महाडीक, लक्ष्मण माने दत्तात्रय मस्के गिरीश कुलकर्णी, बाळासो महाडीक, माजी सरपंच संतोष महाडीक, दिपक महाडीक, गणेश पवार, हणमंत महाडीक, शहाजी मोरे, सचिन महाडीक, लक्ष्मण माने, बबलु सावंत, मुकूंद सुकटे, सोमनाथ महाडीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments