Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय अत्यंत दुर्दैवी : पृथ्वीराज पाटील

सांगली, ( प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण रद्द करण्यासंबंधीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या निकालामुळे मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालून मार्ग काढावा आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेला आणि मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेला मराठा आरक्षणाचा कायदा मा. सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला आहे. हा निकाल अत्यंत दुर्दैवी असा आहे. या निर्णयाने मराठा समाजातील गरजू, गरीब, शेतकरी अशा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झाला आहे. अशा पद्धतीने या समाजावर अन्याय करून चालणार नाही. 

या कायद्यातील उणिवा दुरुस्त करून केंद्र सरकारने घटनेत काही बदल करावेत आणि या समाजाला न्याय द्यावा, अन्यथा या निर्णयाचे खूप गंभीर परिणाम मराठा समाजाला भोगावे लागतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments