Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आनंदरावशेठ पवार यांच्याकडून ५१ हजारांचा मदत निधी सुपूर्द

विटा (प्रतिनिधी) : वासुंबे गावचे व्यावसायिक आनंदरावशेठ सुबराव पवार (पटना) यांच्याकडून कोव्हीड सेंटर आणि रुग्ण वाहिकेसाठी ५१ हजारांची मदत देण्यात आली. आनंदरावशेठ पवार यांनी मदतीचा धनादेश आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे सुपूर्द केला. 

कोरोनाच्या भीषण संकटात अनेक दानशूर लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने परिसरातील रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा अहोरात्र देण्यात येत आहे. या रुग्णवाहिकेच्या इंधन खर्चासाठी वासुंबे गावचे व्यावसायिक आनंदरावशेठ सुबराव पवार (पटना) यांच्याकडून २१ हजार रुपये तसेच जि.प. आणि पंचायत समितीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथे सुरू असलेल्या मोफत कोव्हीड सेंटरला लागणाऱ्या औषधांसाठी ३० हजार रुपयांची मदत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कोरोनाच्या संकटात लोकांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या आनंदरावशेठ पवार यांचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आभार मानले.

यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुहासभैय्या बाबर, वासुंबे गावचे माजी उपसरपंच विकास पवार, तानाजी पवार, सुरेश भिंगारदेवे, बामणी गावचे भरत अण्णा लेंगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments