Daily Mahasatta

Daily Mahasatta

पत्नीचा निर्घृण खून करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

शिराळा (विनायक गायकवाड) : फकीरवाडी ता. शिराळा येथे पत्नीचा खून करून पतीने कीटकनाशक औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती अत्यावस्थ आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फकीरवाडी येथील सुवर्णा सुभाष पवार (वय ३२) व सुभाष सदाशिव पवार (वय ३६) हे दांपत्य आपल्या शेतामध्ये पिकावरती औषध फवारणी करण्याकरता सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गेले होते. शेतामध्ये औषध फवारणी करत असताना दोघांमध्ये वाद झाला. दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात सुभाष याने पत्नी सुवर्णा हिच्यावर कोयत्याने वार केले. यानंतर स्वतः औषध फवारणी साठी आणलेले औषध पिले.

यामध्ये पत्नी सुवर्णा हि जास्त रक्तस्त्राव झालेने जागेवर मृत झाली. तर सुभाष यास जास्त त्रास होऊ लागल्याने त्यास कोल्हापूर येथील सी. पी. आर. मध्ये दाखल केले आहे. सुवर्णा हिचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments