Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राहुल पाटील यांचे कार्य कौतुकास्पद - तहसीलदार गणेश शिंदे

शिराळा (विनायक गायकवाड) : आय. एफ. एस. अधिकारी राहुल पाटील यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.

शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयास आय. एफ. एस. अधिकारी राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून कॅपिटालँड कंपनी पुणे व स्वराज्य फाउंडेशन बिळाशी यांच्या वतीने सुमारे एक लाख रुपये किंमतीचे 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन' देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी ओंकार देशमुख प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले की, राहुल पाटील यांनी प्रशासकीय सेवा बजावत आपल्या गावाकडील माणसांसाठी आपण काहीतरी समाजकार्य केले पाहिजे या हेतूने त्यांनी मागील वर्षीच्या महापुरा वेळी गरजु लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे किट, सुरवातीच्या कोरोना काळात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच बिळाशी परिसरातील वाड्यावस्तांवर चांगल्या दर्जाचे मास्क व सॅनिटायझर वाटप केले होते. त्यांनी स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू ठेवलेले सेवावृत्ती कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.

याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. जलील मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महींद, डॉ. विनायक धस, डॉ. मयुरी राजमाने, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील, पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, धोंडीराम कुंभार, उमेश खोत, प्रकाश पाटील, सचिन पाटील, दिपक रोकडे, गणेश पाडळकर, प्रताप पाटील, समीर मुलाणी आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments