Daily Mahasatta

Daily Mahasatta

अँबुलन्स चालकांनी जादा पैसे घेतल्यास तक्रार करा - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली (प्रतिनिधी ) : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 12 एप्रिल 2021 पासून अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनर क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित वाहन चालक / मालक यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत पुढीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करावे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी  25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी.

Post a Comment

0 Comments