Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारती हॉस्पिटलचे कडेगावात अद्यावत कोव्हिड सेंटर, रुग्णांना दिलासा

कडेगाव ( सचिन मोहिते )
कडेगाव तालुक्यात ऑक्सीजन बेडची कमतरता भासत असल्याने मंत्री डॉ .विश्वजीत कदम यांनी भारती हॉस्पिटलतर्फे कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या कन्या महाविद्यालयात सुसज्ज असे २५ ऑक्सिजन बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. या कोव्हीड सेंटरमुळे कडेगाव तालुका आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात आणि सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु आहे. अशावेळी कडेगाव, पलूससह ग्रामीण भागातील रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णांना उपचारासाठी सांगली, मिरजसह अन्य शहरात हालवावे लागत आहे. मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी याची गांभीर्याने दखल घेत कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या कन्या महाविद्यालयात सुसज्ज असे २५ ऑक्सिजन बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. या सेंटर मध्ये सद्यस्थितीत ४ रुग्ण उपचार घेत आहेत. सदरच्या सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तालुक्यासह मतदार संघातील सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा व उपचार सुविधा कमि खर्चात व वेळेवर पुरविण्यासाठीच कोव्हिड सेंटर सुरु केल्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले .
या कोव्हिड सेंटरचे कामकाज भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप पहात आहेत. तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांना रुग्णांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना देत असतात.

Post a Comment

0 Comments