Daily Mahasatta

Daily Mahasatta

जिल्ह्यातील घाऊक किराणा माल विक्री रविवारपासून बंद

सांगली (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिनांक १९ मे सकाळी ७ वाजल्या पासून २७ मे सकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि. १९ ते २२ मे या कालावधीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत फक्त किराणा साहित्याचे घाऊक विक्रेते यांच्याकडून फक्त किरकोळ किराणा विक्रेते यांना खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे व्यवहार रविवार, दिनांक २३ मे २०२१ पासून बंद राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्‍ट केले आहे.

दिनांक १९ ते २६ मे २०२१ या कालावधीत किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. किरकोळ किराणा विक्रेत्यांना किराणा साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी १९ ते २२ मे २०२१ या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत कृषि उत्पन्न बाजार समितीमधून या साहित्याच्या घाऊक विक्रेत्यांना फक्त किरकोळ किराणा विक्रेत्यांना माल विक्रीची परवानगी देण्यात आली होती. 

Post a Comment

0 Comments