Daily Mahasatta

Daily Mahasatta

अंबामाता उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद : पोलिस निरीक्षक चिल्लावार

शिराळा : अंबामाता उद्योग समूहाचे वतीने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करताना विश्वास कदम, दिनेश हसबनीस, विनायक गायकवाड व ऋतुराज कदम.

शिराळा (विनायक गायकवाड) : अंबामाता विविध उद्योग समूहाच्या वतीने विश्वास कदम यांनी कोरोना काळात सातत्य ठेवून जपलेली सामजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे मत पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी व्यक्त केले.

अंबामाता विविध उद्योग समूहाच्या वतीने शिराळा पोलिस स्टेशन व कोकरुड पोलिस स्टेशन मध्ये सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अंबामाता उद्योग समूहाचे प्रमुख विश्वास कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, अंबामाता उद्योग समूहाचे वतीने गत वर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्यावर्षी उद्योग समूहाच्या वतीने त्यांनी गरजूंना अन्नधान्य किट, भाजीपाला देऊन मदतीचा हात पुढे केला होता. यावर्षी पोलिस बांधवांचे कष्ट लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून सॅनिटायझर व मास्क देऊ केले आहेत. ही बाब निश्चितच सामजिक बांधिलकीच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

कोकरूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ म्हणाले, विश्वास कदम यांच्या सारख्या लोकांनी पोलिसांच्या प्रती दाखवलेले प्रेम आम्हाला काम करायला अधिक प्रोत्साहित करते. आरोग्याची काळजी आणि सुरक्षितता या दृष्टीने विचार करता फ्रंट लाईन वर्कर यांच्याकरिता असे उपक्रम ठीक ठिकाणी होणे गरजेचे आहेत.

यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड, संजय कदम, हिंदुराव पाटील, नितीन घोरपडे, चंद्रकांत कांबळे, ऋतुराज कदम, प्रितेश कदम यांच्यासह शिराळा व कोकरुड पोलिस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments