Daily Mahasatta

Daily Mahasatta

मनसेनेतर्फे हराळे मळ्यात शंभर कुटुंबांना भाजीपाला वाटप

विटा (प्रतिनिधी) : या कोरोना साथीच्या महामारी संकटात बऱ्याच कुटुंबातील लोकांचे रोजगार गेले. याला लाॅकडाउन परिस्थितीत भाजीपाला व किराणा घेण्यासाठी बाजारपेठा बंद असताना मनसेतर्फे हराळे मळा येथे 100 गरजू कुटुंबांना भाजीपाला वाटप करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण सामाजिक बांधिलकी जपत या कुटुंबाना आधार देण्याचे काम केले आहे. भविष्यातही येणाऱ्या कोणत्याही संकटाला न घाबरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कुटुंबाच्या अडीअडचणीला त्यांच्या पाठीमागे थांब उभी राहणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते खानापूर तालुक्यात जिवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करीत आहे. ऑक्सीजन बेड न मिळणे औषध गोळ्या. रेशनचे धान्य व कोवीड रुग्णालयातील भरमसाठ बिल कमी करून घेणे यासाठी अहोरात्र झटत आहेत. या वेळी उपस्थित विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुजित पोद्दार, विटा शहर उपाध्यक्ष सुरज तांबोळी, कृष्णत देशमुख, तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे, चैतन्य गायकवाड सुशील कुमार शिंदे, अपुल बुधावले व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments