Daily Mahasatta

Daily Mahasatta

नेर्लेत कै. तुषार माने यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

पेठ (रियाज मुल्ला) : नेर्ले ता. वाळवा येथील कै. तुषार जितेंद्र माने यांच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थ झालेल्या रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोनाची महामारी अन जिल्ह्यात रक्ताचा कमी पडत असलेला तुडवडा पाहता कै. तुषार माने मित्र परिवार यांचे वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांना भेटवस्तू व रक्तदान प्रमाणपत्र देण्यात आले. कोरोनाचा काळ असताना युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन परिसरातील युवकांनी रक्तदान केले.

नेर्ले गावच्या सरपंच सौ. छाया रोकडे, वैद्यकीय अधिकारी सागर शिंदे, बाळासाहेब रोकडे, जितेंद्र माने, प्रविण माने, जयकर माने यांचे हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी भेट दिली. श्री. माने यांनी रक्तदान शिबिरातील युवकाच्या रक्तदान सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. मानस ब्लड बँक मिरज यांनी रक्तसंकलन केले.

कै तुषार माने याचे मित्र सौरव उर्फ सत्या पाटील, विश्वजित पाटील, सागर पाटील, सुरज माळी, निकेत माळी, विशाल गावडे, पवन गुरव, आदित्य शिद,पारस माने, तेजस कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. मानस ब्लड बँकेच्या समन्वयक सारिका जगताप, डॉ विशाल पाटील, यांनी रक्त संकलन केले. नेर्ले गावात रक्तदान शिबिराचे महत्व निर्माण होत असून २०० च्या वर रक्तदान करणाऱ्या युवकांनी फौज तयार होत आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
----------------------------
युवतीनी केले रक्तदान !
आजच्या रक्तदान शिबिरात वैष्णवी माने, रोहिणी पाटील, आरती माने, अमृता माने या युवतीनी रक्तदान केले. युवतींचा सहभाग परिसरात कौतुकाचा विषय होता.

Post a Comment

0 Comments