Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री जयंत पाटील यांच्या पुत्राने पोलीसांना ठोकला 'सॅल्यूट'

इस्लामपूर (हैबत पाटील) : पोलीसदादा, तुम्ही रात्रंदिवस बजावत असलेल्या 'ड्युटी'मुळे आम्ही सुखाने रहात आहोत. आपण 'कोरोना'च्या संकटाविरोधात रस्त्यावर पाय रोवून उभा राहिल्याने कोरोना काहीसा आटोक्यात आला आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान असून आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत, अशा भावना युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी पत्राद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविल्या आहेत. मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाने पोलीसांच्या कामगिरीला सॅल्यूट ठोकत दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, आष्टा, कासेगाव, कुरळप येथील ३१५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व सन्मानपत्र वाटप करण्यात आले.
मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, 
'आपण रात्रंदिवस बजावत असलेल्या ड्युटीमुळे समाजात कायदा,व सुव्यवस्था असून आम्ही सुखाने रहात आहोत. सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात आपण रस्त्यावर उतरून पाय रोवून उभा ठाकला आहात. आपण आपली, आपल्या कुटुंबापेक्षा समाजाची काळजी करीत 'खाकी'बाणा दाखवीत आहात. त्यामुळे कोरोना काहीसा आटोक्यात येत आहे. आम्हास आपला सार्थ अभिमान असून आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत,असा भावना श्री. पाटील यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत. 

इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्रा. शामराव पाटील, पक्षप्रतोद संजय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी बापू पाटील,कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष एम. जे. पाटील, आष्टा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे,युवक शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, जेष्ठ नेते रघुनाथ जाधव, कासेगाव येथे माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, जि. प. सदस्या सौ. संगीता पाटील, सरपंच किरण पाटील, ज्ञानदेव पाटील, तर कुरळप येथे जि. प. सदस्य संजीव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे वाटप केले आहे.

इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, आष्टयाचे पोलीस निरीक्षक सिद्ध,कासेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, कुरळपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मदत स्विकारताना कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक विनायक मुळीक, राजाराम जाधव, शशिकांत वायदंडे, प्रसाद शेळके, विनायक जगताप यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Post a Comment

1 Comments