Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक , १८३३ पाॅझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा पुन्हा एकदा विस्फ़ोट झाला असून आज बुधवार ता. ५ रोजी एकाच दिवशी १८३३ इतके आजपर्यंतचे उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. तसेच दिवसभरात ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

राज्यभरासह सांगली जिल्ह्यात कोरोना चा आकडा स्थिरावल्यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आज एकाच दिवशी १८३३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज मिरज तालुक्यात २९० तर जत तालुक्यात २७० इतके सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

आज दिवसभरात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १३६, जत-२७०, कडेगाव- ११९ कवठेमंहकाळ- १५६, खानापूर- १२१, मिरज - २९०, पलूस -८९, शिराळा- ७८, तासगाव- १५९, वाळवा-१४४ तसेच सांगली शहर १३९ आणि मिरज शहर १३२ असे सांगली जिल्ह्यात एकूण १८३३ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात ११४५ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे.

Post a Comment

0 Comments