Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडातील उद्योजकास २० लाखाचा गंडा

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड एमआयडीसीतील एका उद्योजकाला त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने २० लाख ८४ हजार ९१५ इतक्या रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

कुपवाड औधोगिक वसाहती मधील एस. आर. डिस्ट्रीब्युटर्स कंपनी असून या कंपनी मध्ये काम करणारा कर्मचारी संशयित निखील मोहन कदम (वय २४,रा. बामणोली) याने बॅकेत भरणा करण्यासाठी दिलेल्या रक्कमेतून वेळोवेळी काही रक्कम काढल्याचे तसेच बॅकेच्या स्लीपवर खाडाखोड करून २० लाख ८४ हजार ९१५ रुपये परस्पर लाटून् फसवणूक केल्याची तक्रार कुपवाड एमआयडीसीतील एस. आर. डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे मालक सिध्दार्थ बाफना यांनी दिली असून कुपवाड पोलिसांनी गुरुवारी संशयित निखील मोहन कदम (वय २४,रा. बामणोली) या कामगारास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments