Daily Mahasatta

Daily Mahasatta

खासदार धैर्यशील माने यांची आज शिराळा तालुक्यात आढावा बैठक, पहा कोणत्या ठिकाणी भेट देणार?

शिराळा (विनायक गायकवाड)
शिराळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांचा आज तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत दौरा होणार आहे.

खासदार धैर्यशील माने सकाळी १० वा. शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट देऊन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घ्यायला सुरवात करतील. एमआयडीसी मधील आयसेरा बायोलोजिकल या लस तयार करणाऱ्या कंपनीला देखील भेट देऊन पाहणी करणार आहेत. अंत्री बु., शिरसी, चरण, आरळा, मणदुर, कोकरूड, सागाव येथील आरोग्य केंद्रांना ते दिवसभरात भेटी देणार आहेत.

खासदार धैर्यशील माने यांच्या या दौऱ्यात लसीकरण विभाग, ओक्सिजन विभाग, कोरोना बाधीतांवरील उपचार, उपलब्ध बेड, अँब्युलन्स, गृह अलगिकरण, ग्राम समित्यांची कामे, पोलिस विभाग यासह उपलब्ध आरोग्य सोयी सुविधांची माहिती घेऊन अपुऱ्या सोयी सुविधा बाबत निर्णय होऊ शकतो. तसेच तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढण्याच्या दृष्टीने हा दौरा आयोजित केल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments