Daily Mahasatta

Daily Mahasatta

मोदींच्या कारभाराच्या निषेधार्थ सांगलीत आंदोलन

सांगली : केंद्रातील मोदी सरकारच्या सात वर्षांच्या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने रविवारी काळे झेंडे दाखवण्यात आले.

सांगली, (प्रतिनिधी) : 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास'. मोदींच्या या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे आज सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काळे झेंडे दाखवत काँग्रेस भवनजवळ आंदोलन करण्यात आले. 


या आंदोलनासंदर्भात बोलताना श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, मोदी सरकारच्या सात वर्षांच्या अपयशी कारभाराची कुंडलीच काँग्रेसने जनतेसमोर मांडली आहे. त्यांच्या कारभारामुळे देशात काळोख पसरला आहे, त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी पक्षाच्या वतीने राज्यभर काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात येत आहे.

ते म्हणाले, मोदी सरकारने
कोविड साथ नियंत्रणात अत्यंत गाफीलपणा दाखवला आहे, दुसरी लाट रोखण्यात त्यांना पूर्ण अपयश आले, लोकांचे पूर्ण क्षमतेने लसीकरण ते करू शकले नाहीत. 
पेट्रोल-डिझेलच्या किंमती रोज भरमसाठ वाढत आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. महागाईवर त्यांचे नियंत्रण राहू शकले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय चुकीचा ठरला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. 
शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे तीन काळे कायदे मागे घेण्यासाठी गेले अनेक महिने आंदोलन चालू आहे, तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की झाली आहे. मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोल कंपन्या, बँका आणि सरकारी आस्थापना ते विकायला लागले आहेत.

या अपयशी मोदी सरकारचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यासाठी प्रतिकात्मक सात पुतळे तयार करून त्यावर काळे फासले होते, आणि सरकारच्या अपयशाचे मुद्दे असलेले फलक लावले होते, आणि घोषणा देण्यात येत होत्या. कोरोना निर्बंधाचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात काँग्रेसचे नेते पै. नामदेवराव मोहिते, प्रा. नेमिनाथ बिरनाळे, अण्णासाहेब कोरे, बिपीन कदम, विजय आवळे, अल्ताफ पेंढारी, अजित ढोले, देशभूषण पाटील, आयुब निशानदार, ताजुद्दीन शेख, मौला वंटमुरे, नामदेव चव्हाण, तौफिक शिकलगार, महावीर पाटील, शितल सदलगे, नामदेव पठाडे, आदिनाथ मगदूम, रजिया शेख, माणिक कोलप, मंदार काटकर, राजेंद्र कांबळे, अजित दोरकर, याकूब मणेर, श्रीनाथ नार्वेकर, जावेद मुल्ला, प्रा. वारे, प्रशांत आहीवळे, सचिन चव्हाण, वैभव शिंदे, ॲड. भाऊसाहेब पवार, विनायक तांदळे, अशोक मासाळ आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments