Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीच्या १०० फुटी रोडच्या भोबे गटारीतून आत्तापर्यंत १२ टन कचरा काढण्यात आला आहे.  या भोबे गटारीच्या स्वच्छतेचे ७० टक्के पूर्ण झाले असून यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा काढण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नाले सफाई अंतर्गत भोबे गटार स्वच्छतेची जोरदार मोहीम राबविली जात आहे. 

सांगली कोल्हापूर रोडपासून ते विकास चौकापर्यंत भोबे गटार आहे. या गटारीची स्वच्छता सातत्याने महापालिकेकडून केली जाते. तसेच दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही भोबे गटार स्वच्छ करून त्यातील कचरा आणि गाळ काढण्याचे कामही आरोग्य विभागाकडून केले जाते. सध्या मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून भोबे गटारीची स्वच्छता केली जात आहे. २२ मे  पासून चार जेसीबी आणि दहा कर्मचारी यांच्या माध्यमातून भोबे गटारीची स्वच्छता केली जात आहे. यामध्ये गटारीतील कचरा आणि गाळ जेसीबी आणि मनपा कर्मचारी यांच्या मदतीने काढला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या आदी कचरा काढण्यात आला आहे. २३ मे पासून आजअखेर भोबे गटार स्वच्छतेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित स्वच्छतेचे काम सुद्धा गतीने सुरु आहे. 

या कामाची महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस , विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे यांनी पाहणी करीत सुरु असणाऱ्या स्वच्छता कामाबाबत समाधान व्यक्त केले. या मोहिमेसाठी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक अविनाश पाटणकर या भागाच्या स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे , वैभव कुदळे, प्रणिल माने आणि धनंजय कांबळे , कोमल कुदळे व त्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. 

Post a Comment

0 Comments