Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात बिअर बार फोडून ८ लाखांची दारु लंपास

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड परीसरातील औधोगिक क्षेत्रात असलेल्या प्रियांका बिअर बार फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ८ लाख ७ हजार ७१४ इतक्या किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्याचे घटना घडली असून कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड परिसरातील औधोगिक क्षेत्रात असलेल्या प्रियांका हॉटेल आणि बिअर बार वरती दि १६ ते दि १८ मे या कालावधी मध्ये हॉटेल बंद असल्याचे पाहून मागील बाजूचे ग्रीलचा कोयंडा तोडून अज्ञात इसमाने आत प्रवेश करून आठ लाख सात हजार सातशे चौदा इतकी किमतीच्या वेगवेगळ्या नावाचे दारूच्या बाटल्या चोरुन नेल्या. 

हॉटेल मालक रघुनाथसिह छोटुसिह रजपूत वय वर्षे 55 रा बागेतील गणपती शेजारी सांगली यांनी कुपवाड पोलीस स्टेशन गाठून चोरी करणाऱ्या चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे .कुपवाड पोलीस चोरी झालेल्या जागेचा पंचनामा करून चोरट्यास पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पो नि निरज उबाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments